Ahmednagar Chapter Meeting
आवाहनाला साद देऊन सामाजिक आर्थिक विकास होण्याकरिता आयोजिलेल्या या सूक्ष्म उपक्रमामध्ये उपस्थित राहुन सहभाग नोंदवलेल्या युवक युवतींचे खुप खुप मनपूर्वक आभार..
कार्यक्रम आयोजन समितीचे समन्वयक बी ई नितिनकुमार यांनी प्रोग्राम आयोजनामधील सर्व महत्वाच्या भूमिका मोठ्या कौशल्यपूर्णपणे सांभाळल्या..
हा प्रोग्राम यशस्वी होणे त्यांच्या नियोजनाशिवाय शुन्य आंणि अशक्य होते..त्यांचे लाख लाख आभार..
नियोजन करत असताना
बी ई परीमल निकम साहेब
CSRD कॉलेज चे उपप्राचार्य
डॉ सुरेशजी मुकुटमल सर आणि
व्हिजन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचे संचालक बी ई डॉ रविंद्र यांच्या मुळे कार्यक्रम सकाळच्या सेशन्स पासुन समारोप आणि नंतर सुद्धा पुर्ण काळ उर्जावाण राहिला…
कार्यक्रमात आलेले अधिकारी मार्गदर्शक आणि उद्योजक बीई संदिपजी थोरात यांची उद्योग करण्याची इच्छा मनात निर्माण झाल्यापासुन उद्योग यशस्वी होई पर्यंतची अनुभव यात्रा व्यक्त केली त्यासोबत नव्यानेच उद्योजक बनू इच्छित असणा-या स्त्रियांनी केलेली भाषणे आमच्या मध्ये आणखी नव्या जोमाने काम करण्याची उर्मी जागवणारे ठरली.
मित्रानो,आज कुणी एकटे लढले तर शुन्यच आहे आपण सारे जर एकत्र आलो व सातत्याने येत राहिलो तसेच ऐकमेकावर विश्वासाने ऐकमेकांच्या सोबत समन्वयांने जबाबदारीने काम केले किंवा करत राहिलो तर आपल्याला आपल्यातील जास्तीतजास्त युवक युवती उद्यमी बनलेले आणि यशस्वी झालेले पहाता येतील.
आज उद्योग सुरु करण्यासाठी काय काय आवश्यक आहे ते समजले आहे.,योजनासुध्दा समजून सांगितल्या गेल्या आहेत. आता आपण नुसती इच्छाच बाळगत होतो की,”आपल्याला
उद्योजक बनायचे आहे पण आता कृतीची सुरुवात करा.,जेथे अडचण आली तेथे आम्ही तुमच्यासोबत आहोतच..फक्त ध्यानात ठेवा की,यशाकडे जाणारी प्रत्येक पायरी चढने सहज सोप्पे नाही..आपल्याला नियोजनबध्द कष्ट अर्थात स्मार्ट वर्क करणे अपेक्षीत आहे,त्यानंतर मग यश तुमचेच आहे..
मग काय विचार करताय?
चला उद्योजक बनू या..!
स्वत:ला आर्थीक सक्षम बनवताना त्यामाध्यमातून समाजाच्या आर्थीक विकासातील सहयोगी बनु या…!
जयभीम….!
आपले सहकारी
बी ई टिम अहमदनगर चाप्टर
BEACI Social Media
Join WhatsApp Group