दिनांक 25 मे 2018 चा बुद्धिस्ट एंटरप्रिन्यूर्स (Buddhist Entrepreneurs) तर्फे आयोजित NSIC चा स्पेशल एंटरप्रिन्यूर डेव्हलपमेंट प्रोग्राम ला खूप चांगला आणि यशस्वी प्रतिसाद दिलात त्यामुळे आपल्या सर्व उपस्थितांचे खूप सारे अभिनंदन तसेच धन्यवाद.

NSIC सोबत इतर विभागातून तसेच बँकेतून काही मुख्य अधिकारी वर्गातून मान्यवर आलेले, त्यांनी पूर्णपणे मोकळेपणाने शासनाच्या विविध घटकांची माहिती आम्हाला पुरवली की त्याच्यातून आपण आपला व्यवसाय शासनासोबत कसा करू शकतो हे समजावून सांगितले. त्यांनी दिलेला मोलाचा वेळ आणि माहिती त्यासाठी आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत.

अशा यशस्वी कार्यक्रमाला ज्या विशेष मान्यवरांची उपस्थिती आपल्यांना लागली ते पुढील प्रमाणे :

  • आयु. रत्नदीप कांबळे सर { Founder Chairman – Buddhist Entrepreneurs Association of Commerce & Industry }
  • आयु. संजय भोंडेकर सर { NSIC – General Manger }
  • आयु. गणेश राणे सर { NSIC – In charge NSSHO }
  • आयु. एस. के. शर्मा सर { Mumbai Port Trust – Sr. Dy. Material Manager }
  • आयु. पी.एल. काशिकेदार सर { Mazgaon Dock Ltd. -Chief Manager – (Supplier Relation & Registration) }
  • आयु. ए. पी. सांगोले सर { Western Railway – Dy. CME (CMR) }
  • आयु. बी. टी. लालगे सर { Western Railway – Dy. CMM (CMR) }
  • आयु. संदीप बनसोडे { Yes Bank Ltd. – Cluster Head }
  • आयु. केशव कांबळे सर { KVIC – Former CEO }

बुद्धिस्ट एंटरप्रिन्यूर्स (Buddhist Entrepreneurs) संघटना ह्यापुढेही आपल्यासाठी नवनवीन उपक्रम राबविल आणि अशा संधीतून फायदा आपल्या सर्वांना नक्की होईल ह्यात तिळमात्रही शंका नाही.

बुद्धिस्ट एंटरप्रिन्यूर्स (Buddhist Entrepreneurs) ही संघटना भारतात 12 राज्यात आणि 7 आंतरराष्ट्रीय देशासोबत मिळून काम करत आहेत. आपली ताकत आपणच आहोत, त्यामुळे चला एकत्र येऊयात,

Share this Post: