कोरोना महामारी नंतर, खूप दिवसाच्या कालावधी नंतर परत एकदा – बुद्धिस्ट इंट्रेप्रेनरच्या – मीटिंग सत्राला सुरुवात झाली,

मीटिंग ही महाबोधी बुद्ध विहार, शुक्रवारी भंडारा इथे घेण्यात आली, मीटिंग मध्ये सूत्र संचालन – बी ई धम्मदीप चव्हाण यांनी केले, त्यानंतर –

बी ई ची माहिती – बी ई अमोल भिवंगडे यांनी दिली, सी एम ई जी पी योजनेची माहिती – बी ई डॉ. मनिष शाक्य यांनी दिली,

त्यानंतर संपूर्ण सारांश – जशे की, बी ई चा ध्येय, ब्रीदवाक्य, उद्योग कसं करायचा, काय काय बाबी लक्षात ठेवायच्या, उद्योग कसं निवडायचा, अपयशाचे कारण काय असू शकतात, सी एम ई जी पी योजने मध्ये लाभ घ्यायचा असेल तर काय काय करावं लागेल, उद्योगाचे प्रकार, त्याचे फायदे, संघटनेकडून मार्केटींग आणि प्रमोशन साठी होणारा फायदा, बी ई म्हणून प्रत्येक मेंबर्स ची काय जबाबदारी यांची संपूर्ण माहिती बी ई सतिश नागदेवे यांनी दिली.

त्यानंतर प्रश्न उत्तरे याचा एक सेशन घेऊन मेंबर्स चे समाधान करण्यात आले,

Share this Post: