दिनांक 25 सप्टेंबर शनिवार ला,मुंबईला कोविड नंतर प्रथमच रत्नदीप सर मुंबईला आले असताना कोअर टीम ची मीटिंग घेण्यात आली. कोअर टीम ची नव्या नियुक्त्या बाबत चर्चा झाली तसेच पुढील वाटचाली बाबत सरांनी मार्गदर्शन केले
बुद्धिस्ट इंट्रेप्रेनर ची कोरोना काळानंतर पहिली मीटिंग झाली,


काल मीटिंग ला बी ई कोर टीम चे मेंबर्स तसेच नवीन मेंबर्स सुद्धा उपस्थित होते, मीटिंग ही मुंबईला ला खारघर येथे पार पडली.


मीटिंग मध्ये साधारण सर्व विषयावर चर्चा करण्यात आली तसेच मुंबई सारख्या ठिकाणी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे यांवर सकारात्मक चर्चा झाली…
तसेच मुंबई कोअर टीम मध्ये तरुण उद्योजकांची यांची निवड करण्यात आली. रत्नदीप सरांनी त्यांचे कोअर टीम मध्ये स्वागत केले


या वर सर्व नवीन उद्योजकांनी आपले मत मांडले व बुद्धिस्ट इंट्रेप्रेनर चे आभार प्रकट केले …
तसेच मा.रत्नदीप सरांनी मुंबई तील रायगड ज़िल्हाचे chapter घोषित केले आणि विजय लोंडेकर यांना रायगड ज़िल्हाचे coordinator म्हणून नाव जाहीर केले.

Share this Post: