बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती भंडारा टीम

विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त – बुद्धिस्ट इंट्रेप्रेनर, भंडारा टीमच्या वतीने महामानवास त्रिमूर्ती चौक, भंडारा इथे अभिवादन करण्यात आले, त्याच अनुषंगाने लाडू वितरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
बुद्धिस्ट इंट्रेप्रेनर या संघटनेचे फौंडेर – माननीय आयु.रत्नदीप कांबळे सरांच्या आदेशानुसार विविध जिल्ह्यामध्ये – आपापल्या स्तरावर बी ई ने हा कार्यक्रम आयोजित केला होता, तसंच बी ई भंडारा टीम ने मानवंदना देत – लाडू वितरणाचा कार्यक्रम पार पाडला,
स्टॉल चे शुभारंभ हे माननीय बी ई सिद्धार्थ गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले,
या लाडू वितरणाच्या स्टॉल ला – विविध स्तरावरील पदाधिकारी, महिला, सर्व सामान्य नागरिक व तसेच इतर अनुयायांनी भेट दिली व त्याचा आस्वाद घेतला,




BEACI Social Media
Join WhatsApp Group