कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील नव उद्योजक रत्नदीप कांबळे8 यांनी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर मधले शास्त्रज्ञ *डॉ.सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली TARA- यूव्ही-३६० रोबोटची निर्मिती केली आहे. या आगळ्यावेगळ्या नवीन रिमोट सेन्सिंग टेकनॉलॉजीवरचा या रोबोटचा कोव्हीड निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापर ही एक विशेष बाब ठरत आहे. TARA- यूव्ही- 360 सॅनिटायझर रोबोट हे अत्याधुनिक असे तंत्रज्ञान आहे.

या रोबोटचे आज (ता०५) ऑनलाईन अनावरण उर्जामंत्री नितीन राऊत आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. युट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीस प्रा. लि या कंपनीचे डायरेक्टर रत्नदीप कांबळे हे मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे त्या पाठच्या डिझायनिंग मध्ये त्यांनी आपला सर्व वेळ घालवला आणि त्याची ॲक्टीव डिझाईन पूर्ण केले.तसेच यामध्ये असणारे पवन आणि समीर यांच्या इलेक्ट्रॉनिक आणि रोबोटिक्स एक्सपर्ट त्यामध्ये पूर्णपणे कामाला आल आणि या तिघांच्या कामामुळे हा रोबोट तारा युव्ही – ३६० उदयास आला.यामध्ये यामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी चे डॉक्टर सोनकवडे यांच्याकडून टेक्निकल लेवलवर इंटरॅक्शन चालू होता.

Share this Post: