Nagpur

दि. २९.३.२०१९ ला संत कबीर नगर, सुगत नगर जवळ या ठिकाणी असलेल्या बुध्द विहारात बुध्दीस्ट उद्योजकांची बैठक घेण्यात आली व त्या बैठकीला ५५ बुध्दीस्ट उद्योजक उपस्थित होते.

या बैठकीला या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बीई रत्नदीप कांबळे यांनी उपस्थित असलेल्या नवीन बुध्दीस्ट उद्योजकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

त्यातील काही महत्त्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत

  • जास्तीत जास्त नवीन बुद्धीस्ट उद्योजकांना संघटनेसोबत जोडणे.
  • व्यवसाय आपल्या लोकांसोबतच करणे आपली व आपल्या समाजाची प्रगती करणे
  • या बैठकीमध्ये MsME & NSIC विषयी चर्चा करण्यात आली.
  • व्यापार प्रदर्शनी मध्ये SC & ST ला संधी उपलब्ध करून देणे.
  • 4% Procurement policy बद्दलही चर्चा करण्यात आली.
  • नवीन उद्योजकांनी प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.

ही बैठक यशस्वीरित्या पार पाडण्याचे काम बीई रणजित फूले व बीई विरेंद्र मंडपे यांनी केले. त्यांनी पूढेही असेच बैठक घेण्याकरीता सदैव अग्रेसर राहतील व त्यांच्या पूढच्या वाटचालीस संघटने तर्फे मनःपूर्वक हार्दीक अभिनंदन.

Share this Post: