BE Meeting in MUMBAI
उद्योगक्षेत्रात संयमाने वाटचाल करा, मिळणारे यश चिरकाल टिकणारे असेल- डॉ. संजय सोनावणे
पाली-बेणसे दि. (धम्मशिल सावंत)- जिवनात मोठे ध्येय व स्वप्ण उराशी बाळगा. व त्या ध्येपुर्तीसाठी जिध्द, चिकाटी, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा व कठोर परिश्रमाची जोड ठेवा. बुध्दीकौशल्य व मनगटाच्या सामर्थ्यावर उद्योगक्षेत्रात पदार्पण करुन सर्वांगीणदृष्ट्या सक्षम बना असे आवाहन एस.आर.एस.ग्रुपचे चेअरमन तथा नामवंत उद्योजक डॉ. संजय सोनावणे
यांनी केले. डॉ. सोनावणे पुढे म्हणाले की उद्योगजगतातील डायम
बणण्याचे स्वप्ण डोळ्यासमोर ठेवा. हिरा हा कोळशाच्या खाणीत सापडतो. परंतू अनेक कठिण व खडतर प्रकीयेतून आल्यानंतर त्याला हिर्याचे मोल मिळते. जिवनात उद्योगक्षेत्रात पदार्पण केल्यानंतर संघर्ष व खडतर परिस्तिती आव्हान बनून समोर येते. परंतू अशावेळी न डगमगता, खचून न जाता येणार्या प्रत्येक संकटाला व आव्हानाला ध्येर्याने सामोरे जा. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. उद्योग व्यवसायात प्रामाणिकपणा गरजेचा आहे. जलदतेने यश पदरी पडेल असे नाही. तर संयम ठेवून वाटचाल केल्यास यश निच्छीतपणे मिळेल. व मिळालेले यश चिरकाल टिकणारे असेल असे डॉ. सोनावणे आपल्या मार्गदर्शनात यावेळी म्हणाले.6 बुध्दीस्ट इंटरप्रेन्युअर्स इंडिया या संस्थेची प्रगतशिल उद्योगव्यवसाय विषयक महत्वपुर्ण बैठक नुकतीच पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. संजय सोनावणे बोलत होते. बुध्दीस्ट इंटरप्रेन्युअर्स संस्थेचे संस्थापक रत्नदीप कांबळे
यांनी नवतरुण5 बुध्दीस्ट उद्योजकांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळावी. त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या5 जाव्यात. व उद्योगक्षेत्रात एकमेकांना सहकार्य करुन उद्योगव्यवसाय वृध्दीगंत व्हावा याकरीता बुध्दीस्ट उदयोजकांचे बलाढ्य& संघटन निर्माण केले आहे.5000+ उद्योजकांना योग्य प्रकारे दिशा देवून त्यांना उद्योगक्षेत्रात यशस्वी शिखरावर पोहचविण्याचे मुख्य उध्दीष्ट बुध्दीस्ट इंटरप्रेन्युअर्स इंडिया या संस्थेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या संस्थेच्या शाखा यु.एस., यु.के, जपान, जर्मनी, श्रिलंका, रशिया आदी राष्ट्रात विस्तारल्या असल्याने बुध्दीस्ट उद्योजकांना याचा मोठा लाभ होतो. यावेळी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्परेशन लिमिटेड उप महाप्रबंधक जयप्रकाश इंगळे यांनी सरकारी योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. याबरोबरच विश्वजीत भुणेश्वर यांनी कौशल्य उद्योग या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. या6 बैठकीस कोअर कमिटीचे पदाधिकारी संजय गेड्डाम,राधेशाम खिल्लारे, सविता काळे, संतनू काकडे, निनाद गायकवाड, संजय कांबळे आदिंसह नामवंत उद्योजक व मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सविता काळे व संजय कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन संजय गेड्डाम व आप्पा वाघ(सर) यांनी मानले.
BEACI Social Media
Join WhatsApp Group