बुद्ध विहार भिमगिरी पहाडी राजेदहेगाव ( जवाहरनगर परिसर ) येथे होत असलेल्या भिमगीरी बुद्धीस्ट धम्म सम्मेलन या प्रोग्राम निमित्त बी ई भंडारा टीम यांनी – बुद्धिस्ट लोकांना उद्योगाबद्दल माहिती मिळावी तसेच त्यांना मार्गदर्शन मिळावे या करिता तिथे स्टॉल लावले होते….

बी ई स्टॉल चे उद्घाटन हे भिक्खू संघ यांच्या मार्गदर्शनात झाले…

तसेच स्टॉल मध्ये संघटनेचे प्रमुख कोण आहेत आणि संघटनेची संकल्पना – ध्येय – उद्दिष्टे – कार्यप्रणाली तसेच फायदे – हे बॅनर मध्ये नमूद केलेलं होते तसेच वयक्तिक स्वरूपात स्टॉल ला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते सांगण्यात आले, तसेच बी ई भंडारा मधील प्रमुख उद्योजकांनी आपली जास्त जाहिरात व्हावी म्हणून आपली नावे – उद्योगाचे नाव – तसेच आपले दूरध्वनी क्रमांक दिलेले होते…

संपूर्ण दिवसाचा आढावा घेता एकूण ८०० हुंन अधिक लोकांनी बी ई स्टॉल ला भेट दिली, तसेच साधारण ५०० हून अधिक लोकांनी या बद्दल सखोल माहिती जाणून घेतली आणि संघटने ला जुळण्याची तीव्र इच्छा दर्शवली….

हे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात संघटनेचे प्रमुख माननीय आयु रत्नदीप कांबळे सर याचा मोलाचं मार्गदर्शन लाभला, तसेच बी ई भंडारा मधील – सतीश नागदेवे, प्रकाश कांबळे सर, अमोल भिवगडे, धम्मदीप चव्हाण, प्रमोद चव्हाण, अल्पेश गेडाम, निखिल मेश्राम, निखिल मुन, श्याम भालेराव, स्वप्नील भोवते, अनिरुद्ध गजभिये, आलेख रामटेके, पृथ्वीराज गोंडाने, राहुल डोंगरे, दिपंकर कांबळे, कुशन लोणारे इत्यादींनी हातभार लावला…

Share this Post: