राष्ट्रीय लघु उद्योग निगम लिमिटेड(THE NATIONAL SMALL INDUSTRIES CORPORATION LIMITED)
बुद्धिस्ट उद्योजक (BE) व राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हब (NSIC) यांच्या विद्यमानाने काल दिनांक -१८/१०/२०१९ या दिवशी वेळ दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळेत पनवेल मधील प्रसिद्ध हॉटेल “सुरुची हॉटेल” ,जुने पनवेल येथे उद्योजकांना सरकारी योजनाविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करुन झाली.

पनवेल येथे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजकांनकरता सरकारी योजना मार्गदर्शन शिबिर व भारत सरकारकडून मिळणाऱ्या योजना याचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती SC/ST या प्रवर्गातील १००पेक्षा जास्त नविन उद्योजक व व्यवसाय असलेले उद्योजक या कार्यक्रमात उपस्थित होते. तसेच उद्योग/व्यवसायात कारकीर्द सुरू करु इच्छुणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजक उमेदवारांना व्यवसाय क्षेत्राविषयक योग्य मार्गदर्शनाचा मोफत लाभ झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती
आयु.संजय गेडाम सर (BE Mumbai Chapter Head),
आयु.महेंद्र मालवीय सर (NSIC Branch Head),आयु.सचिन कांबळे सर (विपणन अधिकारी कॅनरा बँक),आयु.मयूर वरुडकर (IDEMI),के.सिताराम(कोंकण रेलवे),आयु.अनुपम सोनावणे (RCF),आयु.प्रदीप सावंत (MCED)व सविता काळे बुद्धिस्ट उद्योजक प्रमुख (BE, प्रतिनिधी मुंबई)
तसेच रामनरेश एम. राम (हिन्दुस्तान पेट्रोलियम मुंबई रिफायनरी, Chief Manager)
या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.सुनिल वाघपंजे यांनी केले.तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बुद्धिस्ट समूहातील सदस्य आयु.सुनिल वाघपंजे,आयु.कल्पेश कांबळे,आयु.संजय कांबळे,आयु.सुधाकर कांबळे व आयु.शिलेश कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share this Post: